नमस्कार मंडळी!!
आम्हाला कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की आपण ज्याची आतूरतेने वाट पाहत आहात, तो महाराष्ट्र मंडळ व सर्व याहू ग्रुप्स आयोजित "जल्लोष २००७" , रविवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे !
दिवस: १२, ऑगस्ट, २००७
स्थळ: महाराष्ट्र मंडळ, गांधी नगर, बँगलोर.
वेळ: स. ०८.३० ते सां. ०५.००
मंडळाकडे येण्याचा मार्गदर्शक नकाशा:
कार्यक्रमाची सुरूवात सकाळी ठिक ९ वा. होइल. संपुर्ण दिवस खास आपल्या साठी अनेक धम्माल, मनोरंजनात्मक आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत !!
कार्यक्रमाची काही ठळक वैशिष्टये:
- शिरीश कणेकरांची "कणेकरी"
- मराठमोळी लावणी
- धम्माल विनोदी एकांकिका
- पारितोषिक वितरण समारंभ
- धम्माल गेम्स
आणि.....
प्रवेश शुल्क: रु.२००/- फ़क्त (२ ते ८ वयोगटातील मुलांना रु. १००/-)
प्रवेश शुल्कामधे खालील गोष्टिंचा समावेश आहे:
१) सकाळची न्याहरी व चहा (सकाळी ९ पर्यंतच उपलब्ध)
२) अस्सल मराठमोळ्या पद्धतीचं जेवण
३) सायंकाळचा चहा आणि
४) विजेत्यांसाठी खास बक्षिसे! (जी जिंकण्यासाठी आहेत, खुप सारे गेम्स!)
मग आता वाट कसली बघताय?? त्वरीत आमच्या व्हॉलेंटीयर्सशी संपर्क साधा!!!!
कृपया मिस्ड कॉल्स अथवा एसमएस करू नये.
कळावे,
सौरभ भिडे
9845795858 / 9986918345